जीव माझा कोमळ
मन माझे चंचल
पंख लावूनी या काये ला
आकाशात झाली ओझल
नका थांबवू आज मला
फिरू द्या या नभात
पक्षी बनुनी लपून झयिन
आज मी आभाळात
झाड नदी आणि नर नारी
सुंदर दिसते सृष्टी सारी
आज पाहुद्या या सृष्टी ला
फिरू द्या मला दिशेत चारी
विसरून गेली आज स्वतः ला
आनंदा च्या या क्षणी मी
स्वप्नांचा साकार स्वरूप हा
सौंदर्या ची आज धनी मी
No comments:
Post a Comment