Tuesday, November 29, 2011

बाबा

उन्हात शीतल सावली
पावसात आमचे छत्र
अश्या माझ्या बाबांना
लिहिते आज मी पत्र
उभे तिकडे पलीकडे
बाबा आमचे किती भोळे
सर्व लपविले कष्ट आपुले
पण अश्रू नी भरले डोळे
आमच्या कंटक वाटेत
आपले हाथ पसरविले
आमच्या सुखा साठी
आपले दुख विसरले
बाबा मला द्या अधिकार
पित्ररून चुकविण्या चा
वया च्या या काळात
चक्षु तुमचे बनण्या चा

4 comments: