Tuesday, September 3, 2013

baba tumhi aiktaaye na???

आठवत मला माझ , तुमच्या ऑफिस तुन परत येण्या आधिच
homework पूर्ण करायचं , आणि अभ्यास केला नाही अस,
खोटच तुम्हाला सांगुन माझ तुम्हाला surprise द्यायचं
रस्ता क्रॉस करण्या पासून मला
रस्त्या वर cycle चालवायला शिकवायचं
लढायला मला एकटच पाठवायचं
पण माझ्या माघे तुमचं ठाम उभ राहायचं
मी कधीच धरप डली नाही
तुम्ही होता पाठी शी
निरंतर पुढे वाहाढत राहिली काळजी होती नाही शी
मुलगी आहे घरी च बसवा
जेव्हां सगळे सांगायचे
 मुलगी नाही, माझा मुलगा आहे
तुम्ही त्यांना म्हणायचे
जीवन पथ चे तुम्हीच मार्गदर्शक
कृष्ण तुम्ही, मी सब्यासाची
तुम्हीचं  सांगा, तुमच्या   विना मी
कशी गाडी हाकू या जीवनाची
वाट बघतीये तुमची आता
पूरात जीव फस्लये माझा
माझ्या पाठी वर हाथ फिरवायला , येताये न??
मी कशी एकटीच लढ्तीये , बघताये न ??
माझी हाक बाबा तुम्ही ऐक्ताये न ??
माझी हाक बाबा तुम्ही ऐकताये न ???